आदिवासी कर्ज(Loan) योजना महाराष्ट्र 2024

आदिवासी कर्ज योजना महाराष्ट्र:  नमस्कार मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण आदिवासी कर्ज योजना बद्दल जाणून घेणार आहोत. या लेखांमध्ये शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित आदिवासी कर्ज योजना संबंधित पूर्ण माहिती बघणार आहोत.  त्यामध्ये ही योजना काय आहे, त्या योजनेचे उद्दिष्टे,  लाभ, अटी, आवश्यक असणारी कागदपत्रे आणि आदिवासी विकास योजना पीडीएफ इत्यादी ची माहिती आपण घेणार आहोत.

Join Whatsapp Channel

 चला तर मित्रांनो आता आपण आदिवासी कर्ज योजनेसाठी पात्रता  आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार हे आपण जाणून घेऊया.

आदिवासी कर्ज योजना महाराष्ट्र

हे देखील वाचा: प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 आदिवासी कर्ज (Loan) योजना महाराष्ट्र पात्रता  व लागणारी कागदपत्रे:

  • तहसील कार्यालयाकडून उत्पन्नाचा दाखला
  •  प्रकल्प कार्यालयातील सुशिक्षित बेरोजगार दाखला
  •  शाळेचा दाखला
  •  कोणतेही दोन  जामीनदार
  •  इतर बँकांकडून किंवा संस्थेकडून कर्ज घेतल नसल्याचा ना हरकत दाखला
  •  तहसील किंवा उपविभागीय कार्यालय प्रांत यांचा जातीचा दाखला( आदिवासी दाखला)
  •  स्वतःची घरपट्टी भाड्याची जागा असल्यास करारनामा
  •  व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका न हरकत दाखला किंवा दुकाने अधिनियमाखाली परवाना
  •  व्यवसायाचा अनुभव प्रशिक्षण दाखला
  •  व्यवसायासाठी लागणारे सर्व साहित्याचे कोटेशन
  •  रेशन कार्ड झेरॉक्स
  •  व्यवसाय प्रकल्प अहवाल
  •  स्वतःचा हिस्सा म्हणून भरावयाची दहा टक्के सहभाग रक्कम स्वतःच्या बँक खात्यात शिल्लक असल्याचा दाखला
  •  वाहनासाठी वाहन चालविण्याचा परवाना बॅच व परमिट किंवा प्रवासी वाहतूक परवाना

मित्रांनो वर दिलेल्या अटी आणि कागदपत्रांच्या माहिती सोबतच आता आपण जाणून घेऊया आदिवासी कर्ज योजनेसाठी कोणत्या अटी ठरवण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा: लेक लाडकी योजना महाराष्ट्र|मुलींना मिळणार 75 हजार रुपये|पात्रता, लाभ, असा करा अर्ज

 आदिवासी कर्ज योजना साठी अटी:

  •  आदिवासी असल्याचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  •  उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा ग्रामीण भागासाठी 98 हजार आहे तर शहरी भागासाठी उत्पन्नाची मर्यादा 1 लाख 20 हजार एवढी आहे.
  •  लाभार्थ्याची वयोमर्यादा सर्व योजनांसाठी 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावी.
  • जामीनदारासाठी नोकरी करण्याचे कार्यालय प्रमुखाच्या सहीचे कर्ज वसुली हमीपत्र
  •  अद्ययावत पगार दाखला किंवा शेतकरी असल्याचा सातबारा उतारा

हे देखील वाचा: काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना?

बचत गट किंवा सहकारी संस्थांसाठी आवश्यक कागदपत्रे:

  •  बचत गट किंवा सहकारी संस्थांचे नोंदणी प्रमाणपत्र
  •  बचत गट किंवा सहकारी संस्थांचे सर्व सभासदांची यादी त्यांचे रेशन कार्ड व जातीचे दाखले
  • बचत गट किंवा सहकारी संस्थेचे कमीत कमी सहा महिन्याचे बँक खाते स्टेटमेंट
  •  ग्रामपंचायत किंवा नगरपालिका ना हरकत दाखला
  •  जामीन राहण्यासाठी अध्यक्ष व सचिव यांचे सातबारा उतारे
  •  जो व्यवसाय करावयाचा आहे त्याचे सर्वे साहित्याचे कोटेशन
  •  सहकारी संस्थेचे तीन वर्षाची लेखापरीक्षण अहवाल
  •  नोट:  कोणत्याही योजनेसाठी अनुदान घेतलेले नसावे.

हे देखील वाचा: ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना योजनेअंतर्गत मिळणार 3 हजार रुपये

आदिवासी कर्ज योजना महाराष्ट्र राज्यातील एकूण कार्यालय:

एकूण कार्यालयांपैकी मुख्य व नोंदणीकृत कार्यालय नाशिक येथे आहे.

 शाखा कार्यालय व त्यांच्या अधिनस्त जिल्हे:

अ. क्रमांक शाखा कार्यालयअधिनस्त कार्यक्षेत्र येणारे जिल्हे
1नाशिकनाशिक
2जव्हार( जिल्हा पालघर)पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, व उपनगरे
3जुन्नर( जिल्हा पुणे) पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर,  लातूर, उस्मानाबाद, बीड
4 नंदुरबारनंदुरबार, धुळे
5यावल( जिल्हा जळगाव) जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलढाणा
6 धारणी( जिल्हा अमरावती) अमरावती, अकोला
7यवतमाळयवतमाळ, वाशिम
8 किनवट( जिल्हा नांदेड) नांदेड, परभणी, हिंगोली
9  देवरी( जिल्हा गोंदिया) भंडारा, गोंदिया
10 चंद्रपूर चंद्रपूर
11 गडचिरोली गडचिरोली
12 नागपूरनागपूर, वर्धा

12 thoughts on “आदिवासी कर्ज(Loan) योजना महाराष्ट्र 2024”

  1. आदिवासी विभागामार्फत व्यवसायासाठी कर्ज पाहिजे आहे

    Reply

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!