मध्यान्ह भोजन योजना: नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी एक आहे मध्यान्ह भोजन योजना. मित्रांनो या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना दिवसाच्या मधल्या वेळेस जेवण मिळत आहे. यामध्ये विविध पदार्थांचा समावेश होतो. या योजनेबाबत बोलताना इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाचे सचिव यांनी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांच्या निर्देशनास आणून दिले की, महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांपैकी मोठ्या प्रमाणावर बांधकाम इतर राज्यांमधून आलेले आहेत. हे कामगार स्थलांतरित झालेले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातून देखील बरेच कामगार शहराकडे रोजगाराच्या संधीसाठी येत असतात. अशा बांधकाम कामगारांकरिता बांधकामाच्या ठिकाणी पुरेशी राहण्याची सोय नसते. त्यासोबत स्वयंपाक करण्याचे देखील सोय नसते. त्याचं परिणाम असा की आरोग्याची व कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्याचा परिणाम बांधकाम कामगारांच्या कामावर देखील होतो.
या सर्व बाबी लक्षात घेता विचार विनिमय करून 2017 मध्ये 28 फेब्रुवारी रोजी बैठकीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेला प्रथम शासन मान्यता देण्याचा विचार मांडण्यात आला. सहा जून 2017 रोजी झालेल्या बैठकीत नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात मंडळाची मान्यता देण्यात आलेली आहे.
हे देखील वाचा: अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत घर बांधण्यासाठी मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य
नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना
ही योजना राबविण्यासाठी अनुभवी स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, किंवा अन्य संस्थेची नेमणूक ई-निविदा पद्धतीने करावी असा ठराव करण्यात आला आहे. सदर योजना प्रथम टप्प्यात विभागीय स्तरावर राबविण्यात आलेली आहे. चला तर मित्रांनो आता आपण या योजनेबाबत अधिक माहिती घेऊया. सर्वप्रथम आपण या योजनेच्या काही नियम आणि अटी पाहूया.
हे देखील वाचा:बांधकाम कामगार योजना फायदे कोणते?
नोंदीत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजना अंतर्गत नियम आणि अटी कोणत्या?
- मंडळामध्ये नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील.
- अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
- बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेचा लाभ घेत असता कामा नये.
मध्यान्ह भोजन योजना साठी लागणारी कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- रहिवासी दाखला
- ई-मेल आयडी
- काम करत असलेला बांधकामाचा पत्ता
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- बँक खाते क्रमांक( सत्य प्रत)
- शाळा सोडल्याचा दाखला( जन्मतारीख पुरावा म्हणून)
- महानगरपालिका कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- घोषणापत्र
- ग्रामपंचायत ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
हे देखील वाचा:महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजना
मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती?
मित्रांनो, या योजनेचा लाभ तुम्हाला देखील घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वरून मध्यान भोजन योजनेचा अर्ज डाऊनलोड करा. हा अर्ज डाऊनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट काढा. त्यावर विचारलेली सर्व माहिती भरा. सोबत जोडावयाची सर्व कागदपत्रे त्यासोबत जोडा. आणि हा अर्ज कागदपत्रांसोबत तुमच्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करा. अशाप्रकारे अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा | Click Here |