प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना | बांधकाम कामगार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी पात्रता व अटी, अर्ज पद्धती, कागदपत्रे संपूर्ण माहिती

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना: मित्रांनो, इमारत व इतर बांधकाम कामगार महामंडळाच्या योजनांपैकी एक आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. ही योजना सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मोडली जाते. मोदी सरकारने सर्वसामान्य नागरिक, मजूर, गृहिणी आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची सुरुवात केलेली आहे. असंघटित क्षेत्रात कमी उत्पन्न असणाऱ्यांसाठी सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केलेली आहे.

 या योजनेचा  मुख्य उद्देश सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देणे हा आहे. ज्या व्यक्तीचे महिन्याचे उत्पन्न पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यालाच या योजनेचा लाभ होऊ शकतो. असंघटित क्षेत्रात काम करणारे जवळपास दहा कोटी लोक पुढील पाच वर्षात या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतील. आणि हा लाभ देण्यासाठी सरकारने 500 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे.

Join Whatsapp Channel

 प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

मित्रांनो, तुम्हाला ऐकून बरे वाटेल की ही योजना पुढील पाच वर्षात सर्वात मोठी पेन्शन योजना होईल. या योजनेची सुरुवात 36 राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे. आणि आत्तापर्यंत 46 लाख पेक्षा जास्त लोकांनी या योजनेअंतर्गत सहभाग घेतलेला आहे.

 जवळजवळ तीन लाखांपेक्षा जास्त संपर्क केंद्र आपल्या देशभरात आहेत. जवळपास 42 कोटी पेक्षा जास्त असं संघटित क्षेत्रात काम करणारे मजूर आहेत. यामध्ये  फेरीवाले, मध्यान्ह भोजन कामगार,हेड लोडर, वीज भट्टी कामगार, मोची, चिंध्या  वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षा चालक, भूमिहीन मजूर इत्यादींचा समावेश आहे.

 या सर्व व्यक्तींना त्यांच्या वृद्धापकाळसाठी सामाजिक सुरक्षा कवच प्रदान केले पाहिजे. या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री मानधन योजना सुरू केलेली आहे. याआधी आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि सोबतच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणलेल्या होत्या. चला तर मित्रांनो आता आपण या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊया.

हे देखील वाचा: अशा प्रकारे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ मिळणार थेट तुमच्या बँक खात्यामध्ये

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय?

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत महिन्याला पंधरा हजार रुपये पेक्षा कमी उत्पन्न असणारे व्यक्ती लाभ घेऊ शकतात.
  •  18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणताही व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
  •  ज्यांनी  या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे त्यांना त्यांच्या वयाच्या साठ वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळेल.
  •  म्हणजे 60 वर्ष वय झाल्यानंतर वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन मिळेल.
  •  जर पेन्शन धारकाचा मृत्यू झाल्यास 50 टक्के रक्कम त्याच्या जोडीदारास म्हणजेच वारसास मिळेल.
  • पीएम श्रमयोगी मानधन योजनेचा फायदा फेरीवाले, मध्यान्ह भोजन कामगार,हेड लोडर, वीज भट्टी कामगार, मोची, चिंध्या  वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षा चालक, भूमिहीन मजूर  इत्यादी. व्यक्तींसाठीच उपलब्ध आहे.
  •  तुम्हाला जर  या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करावा लागेल.

हे देखील वाचा: Mazi kanya bhagyashree yojana apply online

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत प्रीमियम कसा भरावा?

 मित्रांनो, या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या वयोगटा नुसार प्रीमियम ठरलेला आहे. दरमहा ५५ ते २०० रुपये योगदान द्यावे लागेल. तुम्ही जितकी रक्कम या योजनेत गुंतवाल तितकीच रक्कम केंद्र सरकारकडून त्यामध्ये भरली जाईल. म्हणजेच जर तुम्ही तुमच्या वयाच्या अठराव्या वर्षी या योजनेत सामील झाला तर दर महिन्याला 55 रुपये द्यावे लागतील. 30 वर्षाच्या व्यक्तीला शंभर रुपये आणि चाळीस वर्षाच्या व्यक्तीला दोनशे रुपये भरावे लागतील. तुम्ही जेवढी रक्कम भरताय तेवढीच रक्कम सरकारकडून तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाईल.

pm shram yogi mandhan yojana या योजनेअंतर्गत लागणारी कागदपत्रे कोणती

  • आधार कार्ड
  •  ओळखपत्र
  •  बँक खाते क्रमांक( पासबुक सत्यप्रत)
  •  पत्रव्यवहाराचा पत्ता
  •  मोबाईल नंबर
  •  पासपोर्ट साईज फोटो

हे देखील वाचा: पोकरा लाभार्थी यादी कशी तपासायची? अशा पद्धतीने पहा यादीमध्ये तुमचे नाव

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा?

mandhan yojana online registration

मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या ई सेवा केंद्र मध्ये जावं लागेल.  तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवर जाऊन देखील हा अर्ज स्वतः भरू शकतात. त्यासाठी खाली दिलेल्या काही स्टेप फॉलो करा.

  • सर्वप्रथम तुम्हाला या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • https://maandhan.in/
  • मुख्यपृष्ठावर आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही ज्या भाषेमध्ये माहिती  पाहू  इच्छिता ती भाषा निवडा. त्यासाठी उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात तुम्हाला पर्याय दिसेल.
  •  नंतर नोंदणी करण्यासाठी लॉगिन(“Login”) या पर्यायावर क्लिक करा.
  •  तुम्ही स्वतः नोंदणी करत असल्याने self enrollment या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  •  त्यानंतर पुढे तुमचा मोबाईल नंबर त्या रकान्यात भरा. आणि तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी रिसीव होईल तो पुढच्या रकाला टाका. Verify वर क्लिक करा.
  •  त्यानंतर अर्ज भरा जिथे तुम्हाला पूर्ण कागदपत्रे jpeg  फॉर्मेट मध्ये अपलोड करावी लागतील.
  •  अर्ज भरल्यानंतर  त्याला एकदा पुन्हा तपासा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.

हे देखील वाचा: फक्त 20 रुपयात मिळणार दोन लाखांचे विमा संरक्षण| असा घेता येणार या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ

pm shram yogi mandhan yojana या योजनेचा लाभ घेण्यासाठी साइन इन प्रक्रिया:

  • मित्रांनो, योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर लॉगिन  पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील:  स्व नोंदणी आणि CSC VLE.
  •  तुम्ही तुमच्या गरजेनुसार त्या पर्यायांपैकी एका पर्यायावर क्लिक करा.
  •  पुढे तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
  •  येथे तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकावा लागेल. सोबतच तिथं विचारलेला त्याच्या टाकावा लागेल.
  •  त्यानंतर साइन इन पर्यायावर क्लिक करा.
  •  अशाप्रकारे तुम्ही मानधनच्या वेबसाईटवर साइन इन होऊ शकता. 
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना pm sym. mandhan yojana online registration. shram yogi mandhan yojana 2024

हे देखील वाचा: SBI Mudra Loan In 59 minutes: दहा मिनिटात असं मिळवा घरबसल्या ५० हजार रुपये लोन

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज कसा करावा?

  • ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारे व्यक्ती जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्राला भेट देऊ शकता.
  •  त्यानंतर  आधार कार्ड, परवाना, पासबुक, आणि पत्त्याचा पुरावा इत्यादी आवश्यक कागदपत्रे CSC अधिकाऱ्याकडे जमा करावे.
  •  कागदपत्रे सबमिट केल्यानंतर तो तुमचा फॉर्म भरेल. फॉर्म भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढेल आणि तुम्हाला देईल.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा Click Here

mandhan yojana online registration, shram yogi mandhan, pm shram yogi mandhan yojana, pradhan mantri shram yogi mandhan yojana, pm sym

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!