तलंगा गट वाटप : नमस्कार मित्रांनो स्मार्ट शेतकरी राजा या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे. आपण एका नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे शासन सर्वसामान्य जनतेसाठी नवनवीन योजना राबवत असते. त्यामध्ये शेती संदर्भातील योजना, जोड व्यवसायासाठीच्या योजना, रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजना यांचा समावेश होतो. अशीच एक योजना आहे तलंगा गट वाटप योजना. तरंगा गट वाटप या योजने संदर्भात शासन निर्णय जाहीर झालेला आहे तो आपण पाहूया. चला तर मित्रांनो आता आपण पाहूया काय आहे हा शासन निर्णय. या योजनेत खालील प्रमाणे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.
तलंगा गट वाटप शासन निर्णय:
या योजनेअंतर्गत सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदानावर आठ ते दहा आठवडे वयाच्या तलंगाच्या25 माद्या आणि त्यासोबतच नर याप्रमाणे गटाचे वाटप करण्यात येत आहे.
तरंगाच्या एका गटाची म्हणजेच 25 माध्या आणि 3 नर यांची एकूण किंमत 6 हजार रुपये मंजूर करण्यात आलेली आहे.
तलंगाच्या एका गटाचा खर्चाचा तपशील खालील प्रमाणे
पक्षी किंमत( 25 माद्या आणि 3 नर) | 3000 रुपये |
खाद्यावरील खर्च | 14 हजार रुपये |
वाहतूक खर्च | 150 रुपये |
औषधी | 50 रुपये |
रात्रीचा निवारा | 1000 रुपये |
खाद्याची भांडी | 400 रुपये |
एकूण | 6 हजार रुपये |
या पैकी 50 टक्के अनुदानातून 3 हजार रुपये मर्यादित प्रतीला भारती एका तलंगाच्या गटाचा पुरवठा करण्यात येईल. उरलेले 50 टक्के रक्कम म्हणजेच 3000 रुपये लाभार्थ्याला स्वतः उभारून त्यातून तरंगाच्या गटासाठी लागणारा निवारा, वाहतुकीचा खर्च, खाद्यावरील खर्च, औषधी, पाण्याची भांडी, त्याची भांडी इत्यादी वरील खर्च करावा लागेल.
चला तर मित्रांनो आता आपण पाहूया तेलंगा गट वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे.
हे देखील वाचा: शासन निर्णय: Sheli Palan Yojana:शेळी मेंढी पालन योजनेला नवीन मंजुरी
तलंगा गट वाटप योजनेअंतर्गत लागणारी कागदपत्रे कोणती?
- सातबारा
- 8अ उतारा
- फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
- आधार कार्ड
- अपत्य दाखला/ स्वयंघोषणापत्र
- रहवासी प्रमाणपत्र
- दारिद्र्यरेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक सत्यप्रत
- रेशन कार्ड
- दिव्यांग असल्याचा दाखला
- जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला
- रोजगार, स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत
- प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची प्रत
- सातबारा मध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र अथवा दुसऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेतलेली असल्यास करारनामा
- अनुसूचित जाती जमातीतील असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत
- बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याचा पासबुकची पहिल्या पानाची प्रत
हे देखील वाचा: नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये ,सरकारने महासन्माननी दिला दिला हिरवा कंदील
तलंगा वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्ती:
- या योजनेचा लाभ कोणत्याही गटातील लाभार्थी घेऊ शकतात. एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- अंमलबजावणी करणारा अधिकारी या योजनेस व्यापक प्रसिद्धी देऊन अर्ज मागवितो.
- जर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर अर्जाचा नमुना तालुका पशुसंवर्धन कार्यालयात, जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- महत्त्वाचं म्हणजे लाभार्थ्याची निवड करत असताना 30 टक्के महिला लाभार्थ्याला प्राधान्य देण्यात येईल.
- तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारून जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यामार्फत जिल्हा निवड समितीच्या मान्यतेसाठी सादर करावे लागत.
- दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, भूमिहीन शेतमजूर, मागासवर्गीय, अल्पआणि अत्यल्प भू लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.
- अर्ज स्वीकारण्यासाठी 30 ते 45 दिवसांची मुदत मिळते. यानंतर अर्ज स्वीकारले जात नाही. सदर अर्जातील वैधता ही चालू आर्थिक वर्षातील उपलब्ध तरतुदीच्या मर्यादेच्या आधी असते. तसेच असा अर्ज पुढील आर्थिक वर्षामध्ये ग्राह्य धरले जात नाही. प्राप्त झालेला अर्जाची तरतूद करून एका महिन्याच्या आत पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येते.
- या योजनेअंतर्गत एखाद्या लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्या लाभार्थ्याचा या योजने करता किमान पुढील पाच वर्षे पुनश्च विचार केला जाणार नाही.
- या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद हे राहतील.
- जिल्हास्तरावर या योजनेचे नियंत्रण जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त हे करतील. त्यासोबत प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त व अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन हे या योजनेचे अनुक्रमे विभागीय आणि राज्यस्तरीयस नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहतील.
हे देखील वाचा: गाय म्हैस वाटप योजना mahabms शासन निर्णय
लाभार्थी निवड समितीमध्ये कोणा कोणाचा सहभाग राहील?
- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त( अध्यक्ष)
- सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी
- महिला व बालकल्याण अधिकारी
- समाज कल्याण अधिकारी
- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी
- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी