गाय म्हैस वाटप योजना mahabms शासन निर्णय : मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये आपण पाहूया की काय म्हैस वाटप योजनेचा शासन निर्णय मध्येकाय म्हटलेले आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात दुग्ध व्यवसायाला चालना मिळण्यासाठी दोन दुधाळ संकरित गाई आणि म्हशींचे गट वाटप करणे या योजनेस शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. ही योजना नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसूचित जाती आणि आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत येते.
या योजनेमध्ये प्रत्येक दुधाळ जनावराची किंमत ही 2011 मध्ये निश्चित करण्यात आलेली होती. आता त्या गोष्टीस परस कालावधी झालेला आहे. याकरिता पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाचे योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्याला अधिक दूध उत्पादन देणारी दुधाळ जनावरे वाटप करणे आवश्यक आहे. नाबार्डने 2021 22 मध्ये प्रति दुधाळ देशी/ संकरित गायीची आधारभूत किंमत 60000 तर त्याचप्रमाणे म्हशीची किंमत 70000 निश्चित केलेली आहे.
त्यानंतर 31 जानेवारी 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक नवीन प्रस्ताव सादर करण्यात आला. दुधाळ गाय म्हैस वाटप योजनेत वाटप करणाऱ्या प्रतिगाईची किंमत 70000 रुपये आणि प्रतिभाषेची किंमत ८० हजार रुपये एवढी करण्यास मान्यता देण्यात आली.
चला तर मित्रांनो आता आपण दुधाळ गाय म्हैस गटाची प्रकल्प किंमत पाहूया.
हे देखील वाचा: नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार 12000 रुपये ,सरकारने महासन्माननी दिला दिला हिरवा कंदील
गाय म्हैस वाटप योजना mahabms शासन निर्णय: दुधाळ गाय म्हैस एका गटाचे प्रकल्प किंमत खालील प्रमाणे
अ.क्र. | तपशील | 2 गाईचा गट | अ.क्र. | तपशील | 2 म्हशीचा गट |
1 | संकरित गायीचा गट प्रति गाय 70000 रुपये प्रमाणे | 1 लाख 40 हजार रुपये | 1 | म्हशीचा गट प्रति म्हैस 80 हजार रुपये प्रमाणे | 1 लाख 60 हजार रुपये |
2 | जनावरांसाठी गोठा | 0 | 2 | जनावरांसाठी गोठा | 0 |
3 | स्वयंचलित चारा कटाई यंत्र | 0 | 3 | स्वयंचलित चारा कटाई यंत्र | 0 |
4 | खाद्य साठविण्यासाठी शेड | 0 | 4 | खाद्य साठविण्यासाठी शेड | 0 |
5 | 10.20 टक्के( अधिक 18 टक्के सेवा कर दराने 3 वर्षाचा विमा) | 16850 रुपये | 5 | 10.20 टक्के( अधिक 18 टक्के सेवा कर दराने 3 वर्षाचा विमा) | 19258 रुपये |
एकूण प्रकल्प किंमत | 1 लाख 56 हजार 850 रुपये | एकूण प्रकल्प किंमत | 1 लाख 79 हजार 258 रुपये |
हे देखील वाचा: जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा?
एकूण गटाच्या किमतीनुसार शासकीय अनुदान आणि स्वहिस्सा मर्यादा खालील प्रमाणे राहील
अ.क्र. | प्रवर्ग | दोन गाईचा गट | अ.क्र. | प्रवर्ग | दोन गाईचा गट |
1 | शासकीय अनुदान अनुसूचित जाती 75 टक्के | 1 लाख 17 हजार 638 रुपये | 1 | शासकीय अनुदान अनुसूचित जाती 75 टक्के | 1 लाख 34 हजार 443 रुपये |
1 | स्वहिस्सा अनुसूचित जाती 25 टक्के | 39 हजार 212 रुपये | 1 | स्वहिस्सा अनुसूचित जाती 25 टक्के | 44 हजार 815 रुपये |
2 | शासकीय अनुदान सर्वसाधारण 50 टक्के | 78 हजार 425 रुपये | 2 | शासकीय अनुदान सर्वसाधारण 50 टक्के | 89 हजार 629 रुपये |
2 | स्वहिस्सा सर्वसाधारण 50% | 78 हजार 425 रुपये | 2 | स्वहिस्सा सर्वसाधारण 50% | 89 हजार 629 रुपये |
हे देखील वाचा: दोन दुधाळ गाई म्हशी वाटप योजनेअंतर्गत मिळणार 75 टक्के अनुदान
गाय म्हैस वाटप योजना mahabms शासन निर्णय
- मित्रांनो या गाय म्हैस वाटप योजनेअंतर्गत शासन निर्णय याची सुरुवात 2023 24 या आर्थिक वर्षापासून करण्यात येत आहे.
- मित्रांनो एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- या योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेमध्ये दररोज दहा ते बारा लिटर दूध देणाऱ्या एचएफ, जर्सी या संकरित गाई
- तसेच प्रतिदिन दहा लिटर दूध देणाऱ्या गिर, सहिवाल, रेड सिंधी, राठी.
- सोबतच प्रतिदिन पाच ते सात लिटर दूध देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ, आणि डांगी गाई यांचा समावेश आहे.
- सोबतच मुर्रा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप करण्यात येत आहेत.
- वाटप करण्यात येणारी जनावरे ही शक्यतो एक दोन महिन्यापूर्वी व्याहलेली आणि दुसऱ्या तिसऱ्या वेतातील असतील.