कृषी तारण कर्ज योजना: मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच जण शेतकरी असाल किंवा शेतकरी पुत्र असाल. तुम्हाला माहितीच आहे जेव्हा शेतमालाचा काढणी हंगाम सुरू होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजेमुळे शेतमाल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येत असल्याने शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की शेतीमध्ये जेवढे पैसे लावून तुम्ही तो माल काढलेला आहे तेवढा खर्चही तुम्हाला मिळत नाही.
हा शेतीतला माल साठवणूक करून काही कालावधीनंतर विक्री केल्यास शेतकऱ्यांना जादा भाव मिळू शकतो. याच दृष्टिकोनातून कृषी पणन मंडळ 2090 91 पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.
हे देखील वाचा: जमीन मोजणीसाठी अर्ज कसा करावा?
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी योग्य भाव मिळावा याच दृष्टिकोनातून कृषी पणन मंडळाने या योजनेची सुरुवात केली होती. या योजनेला बाजार समिती आणि शेतकऱ्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेअंतर्गत तूर मुंग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात, करडई, राजमा, ज्वारी, बाजरी, मक्का, गहू, हळद, काजू बी, बेदाणा आणि सुपारी या प्रकारच्या शेतमालावर शेतकऱ्यांना कृषी तारण कर्ज दिले जाते.
हे देखील वाचा: भारत सरकारच्या e NAM ॲप आणि पोर्टलवर करा कृषी उत्पादनांची ऑनलाइन खरेदी आणि विक्री
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची शेतमाल तारण कर्ज योजना काय आहे?
शेतकऱ्यांकडे त्यांचा शेतमाल साठविण्यासाठी पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतमाल काढणे हंगामात बाजारपेठेत येतो. मोठ्या प्रमाणावर शेतमाल एकाच वेळेस बाजारपेठेत आल्यामुळे त्याला पुरेसा भाव मिळत नाही. शेतमालाचे बाजार भाव खाली येतात. जर हाच शेतमाल आपण साठवून ठेवला आणि काही कालावधीनंतर तो बाजारपेठेत विक्रीसाठी आणला तर त्या मालाची किंमत जास्त मिळू शकते.
शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य तो बाजार भाव मिळावा याच दृष्टिकोनातून कृषी पणन मंडळ ही योजना 1990 91 पासून राबवित आहे. कृषी तारण कर्ज योजनेमध्ये तूर मुंग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात, करडई, राजमा, ज्वारी, बाजरी, मक्का, गहू, हळद, काजू बी, बेदाणा आणि सुपारी या शेतमालांचा समावेश होतो.
हे देखील वाचा: अशी करा ई पीक पाहणी e pik pahani app मधून
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारण करून ठेवलेल्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदाम पावतीवरही शेतकऱ्यांना तारण कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. ही योजना बाजार समित्यांमार्फत राबवली जात आहे.
सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समिती यांना तीन टक्के व्याज सवलत देण्यात येते.
कृषी तारण कर्ज योजनेमध्ये शेतकरी म्हणून तुम्ही तुमचे शेतीतील उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामा मध्ये ठेवू शकतात. आणि त्या गोदामात ठेवलेल्या मालाच्या किमतीच्या 75 टक्के रक्कम कर्ज म्हणून मिळू शकतात.
जेव्हा भविष्यात बाजार येतील शेतमालाच्या किमती वाढतील तेव्हा तुमचे उत्पादन बाजारात विकून त्या कर्जाची परतफेड तुम्ही करू शकतात.
ही योजना तुमच्यासाठी एक वरदान ठरत आहे.
हे देखील वाचा: आम आदमी विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा?
कृषी तारण कर्ज योजनेअंतर्गत काही अटी आणि शर्ती
- शेतमल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतीमाल स्वीकारला जाईल. व्यापारांचा शेतीमाल या योजनेअंतर्गत स्वीकारला जाणार नाही.
- तारण करून ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के पर्यंतचे कर्ज वार्षिक सहा टक्के व्याज दराने मिळेल.
- हे कर्ज या योजनेच्या सुरुवात केल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांचे म्हणजेच 180 दिवस मुदती करता अदा करण्यात येईल.
- बाजार समिती शेतकऱ्यांचा आधार कार्ड क्रमांक घेऊन व त्याची खात्री करूनच तारण कर्ज देईल.
- तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही तात्कालीन बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली आधारभूत किंमत यापैकी जी कमी असेल त्यानुसार ठरवण्यात येईल.
- तारण कर्जाची मुदत सहा महिने म्हणजेच 180 दिवस राहील.
- बाजार समितीने शेतकऱ्यांना दिलेल्या तारण कर्ज रकमेवर वार्षिक सहा टक्के प्रमाणे व्याज आकारणी केली जाईल.
- पणन महामंडळाकडून प्रतिकृती करून घेतलेल्या तारण कर्जबाबत बाजार समिती व मालकीचे गोदामा तारण कर्ज योजना राबवित असल्यास तीन टक्के प्रमाणे
- आणि वखार पावती वर तारण कर्ज दिले असल्यास पाच टक्के प्रमाणे कर्ज आणि त्यावरील व्याजाची कृषी पणन मंडळास परतफेड करावी लागेल.
हे देखील वाचा: साठेखत म्हणजे काय? & साठेखत करणे का आवश्यक असते?
अटी आणि शर्ती
- उर्वरित तीन टक्के किंवा एक टक्का व्याज हे बाजार समितीत प्रोत्साहन पर अनुदान म्हणून देण्यात येईल.
- बाजार समितीने पणन मंडळाकडून घेतलेल्या शेतमाल धारण कर्जाची सहा महिन्यांचे
- म्हणजेच 180 दिवस पूर्ण होण्याच्या आत रक्कम व्याजासोबत परतफेड न केल्यास समितीला प्रोत्साहन पर व्याजाची सवलत अनुदेय राहणार नाही.
- ज्या शेतमालाचा या योजनेत समावेश केलेला आहे त्या शेतमालाच्या तारणावर फक्त शेतकऱ्यांना ते ज्या दिवशी शेतमाल तारण ठेवण्याकरता आणतील त्या दिवसाचे शेतमालाचे बाजार भाव विचारात घेऊन शेतमालाच्या होणाऱ्या एकूण किमतीनुसार रक्कम तारण कर्ज म्हणून सहा महिने मुदतीसाठी वार्षिक सहा टक्के व्याजदराने बाजार समितीने स्वनिधीतून NEFT/RTGS द्वारे अदा करावे.
- सारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक, देखरेख आणि सुरक्षा बाजार समिती विनामूल्य. करते.
- तारण केलेल्या शेतमालाचा विमा उतरविण्याची जबाबदारी सुद्धा बाजार समितीची असते.
- शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत शेतमालाचे प्रकारानुसार तारण कर्जाची मुदत आणि व्याजाचे दर काय असणार?
हे देखील वाचा: प्रधानमंत्री पीक विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता दर काय?
शेतमालाचा प्रकार | कर्ज वाटपाची मर्यादा | व्याजदर( मुदत) |
वाघ्या घेवडा( राजमा) | एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम किंवा 3 हजार रुपये प्रतिक्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम | 6 टक्के(6 महिने) |
काजू बी | एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम किंवा 100 रुपये प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम | 6 टक्के(6 महिने) |
सुपारी | एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम किंवा 100 रुपये प्रति किलो यापैकी कमी असणारी रक्कम | 6 टक्के(6 महिने) |
बेदाणा( मनुके) | एकूण किमतीच्या कमाल 75 टक्के किंवा जास्तीत जास्त 7500 प्रतिक्विंटल यातील कमी असणारी रक्कम | 6 टक्के(6 महिने) |
सोयाबीन, तूर, मुंग, उडीद, चना, तांदूळ, करडई, सूर्यफूल, हळद, ज्वारी, बाजरी, गहू, मक्का | एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम (प्रचलित बाजार भाव किंवा किमान आधारभूत किंमत यापैकी कमी असेल त्या दराने होणाऱ्या एकूण किमतीच्या) | 6 टक्के(6 महिने) |
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करा
शेतमाल तारण कर्ज मिळविण्यासाठी हा अर्ज डाऊनलोड करा.(नमुना क्रमांक 1) | Click Here to Download |
करार पत्र (नमुना क्रमांक 4) | Click Here to Download |
हे देखील वाचा: मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत मिळवा 90% अनुदान संपूर्ण माहिती