ऑनलाईन रेशन कार्ड नाव नोंदणी | रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अशा पद्धतीने करू शकता 

मित्रांनो, ऑनलाईन रेशन कार्ड नाव नोंदणी करणे आता खूप सोपे झाले आहे. शासन आपल्यासाठी विविध योजना राबवत असते. शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड लागतच आणि आपल्या प्रत्येकाकडे हे रेशन कार्ड उपलब्ध असणे आवश्यक आहे. मुलांच्या शिक्षणासाठी देखील रेशन कार्ड ची आवश्यकता भासते. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हे फायदे घेण्यासाठी त्याचे नाव रेशन कार्ड मध्ये नोंदलेले असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन रेशन कार्ड नाव नोंदणी

 शासनाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची सुरुवात झाल्यापासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला मोफत धान्य सुद्धा शासनाकडून दिले जात आहे. बऱ्याच कुटुंबांना हे रेशन कार्ड कसे काढायचे ही माहीत नसते. आणि त्यामुळेच ते या विविध योजनांपासून वंचित राहून जातात. काहींकडे रेशन कार्ड तर असते पण घरामध्ये आलेल्या नवीन व्यक्तीचे नाव त्या कार्डमध्ये कशी नोंदवायचे ही माहिती नसते.

Join Whatsapp Channel

 चला तर मित्रांनो आता आपण हीच माहिती जाणून घेणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड नाव नोंदणी कशी करावी. सर्वप्रथम आपण या नाव नोंदणीसाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे पाहूया.

हे देखील वाचा: ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड साठी असा करू शकता अर्ज|New Ration Card Apply Online

रेशन कार्ड मध्ये नवीन नाव नोंदणी(रेशन कार्ड नाव वाढवणे कागदपत्रे) करण्यासाठी लागणारे कागदपत्रे

आपल्या कुटुंबात जर एखाद्या नवीन व्यक्ती आलेला आहे तर त्याचे रेशन कार्ड मध्ये नाव जोडणे आवश्यक आहे. जसे की कुटुंबात एखादा नवीन बाळ जन्माला आलो, मुलाचे लग्न होऊन सून घरामध्ये आली असे. या व्यक्तींचे नाव रेशन कार्ड मध्ये जोडावे लागते. जेणेकरून तेही विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव वाढवणे पुढील कागदपत्रांची आवश्यकता असते.

हे देखील वाचा: श्रमविद्या शैक्षणिक कर्ज योजना: आता शेतकऱ्यांच्या मुला मुलींनाही मिळणार पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

 नवीन  जन्मलेल्या बाळाचे नाव नोंदणी करण्यासाठी

  • कुटुंब प्रमुखाचे रेशन कार्ड
  •  मुलाचे जन्म प्रमाणपत्र
  •  आई वडिलांचे आधार कार्ड
  •  बाळाचे आधार कार्ड असल्यास सोबत जोडावे.

 सुनेचे नाव रेशन कार्ड मध्ये नोंदणी करण्यासाठी

  •  महिलेचे पतीच्या नावाचे आधार कार्ड
  •  पतीचे आधार कार्ड
  •  कुटुंबाचे रेशन कार्ड
  •  तसेच मुलीचे तिच्या पित्याकडील रेशन कार्ड मधून नाव काढून टाकलेले प्रमाणपत्र

 चला तर मित्रांनो आता आपण पाहूया  ऑनलाइन रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी कशी करायची.

हे देखील वाचा: तुमच्याकडे Yellow ration card असेल तर या योजनांचा फायदा घ्या

ऑनलाइन रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी करण्यासाठी वर दिल्याप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता असते. रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करा.

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी अर्ज

ऑनलाइन रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप फॉलो करा(रेशन कार्ड नाव वाढविणे online)

  • सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या अन्नपुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • https://rcms.mahafood.gov.in/
  • त्यानंतर Login Id  येथे तुम्हाला बनवावा लागेल. पुढे होम पेजवर नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी चा पर्याय दिसेल.
  •  या पर्यायावर तुम्ही क्लिक करा.
  •  समोर नवीन फॉर्म दिसेल. या फॉर्ममध्ये कुटुंबातील नवीन सदस्याची संपूर्ण विचारलेली माहिती भरा.
  •  अर्जासोबत विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  •  हा अर्ज सबमिट करा आणि नंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. या रजिस्ट्रेशन नंबरचा वापर करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात.
  •  तुम्ही सबमिट केलेले कागदपत्रे अधिकारी चेक करतील. ती माहिती योग्य असल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.
  •  त्यानंतर पुढे पोस्ट द्वारे नवीन रेशन कार्ड नवीन व्यक्तीचे नाव ॲड होऊन तुमच्या घरी येईल.

 अशाप्रकारे तुम्ही नवीन व्यक्तीचे नाव तुमच्या रेशन कार्ड मध्ये ऍड करू शकतात. माहिती आवडली असल्यास नक्की शेअर करा. 

हे देखील वाचा: या 7 कागदपत्रांच्या आधारावर तुम्ही जमिनीवर स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करू शकता

Leave a Comment

कॉपी करू नका, तर  शेअर करा!